कमला एकादशीनिमित्त नाथ समाधीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची पैठणमध्ये प्रचंड गर्दी

Foto
पैठण, (प्रतिनिधी) : अधिक मासातील पवित्र कमला एकादशीच्या निमित्ताने गुरुवारी पैठण शहरातील मंदिरात नाथ समाधीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती.

पहाटेपासूनच गोदावरी नदीचे पवित्र स्नान करून विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. गावातील नाथ मंदिर, बाहेरील समाधी मंदिर, दत्त मंदिर तसेच इतर देवस्थानांमध्ये भक्तांनी दर्शन घेत उपवास,
पूजा-अर्चा आणि धार्मिक विधी केले. कमला एकादशीचे धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन परिसरातील तसेच दूरदूरच्या भागांतून भाविक एसटी बस चार चाकी दुचाकी वाहन आहे.

 मध्ये बसून पैठणमध्ये दाखल झाले होते. या गर्दीमुळे पैठण शहरात अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाल्याचे दिसून आले. मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. भजन, कीर्तन आणि नामस्मरणाच्या कार्यक्रमांमुळे धार्मिक उत्साहाला उधाण आले होते. 

भाविकांच्या सोयीसाठी मंदिर समित्या आणि स्थानिक प्रशासनाने आवश्यक व्यवस्था केली होती. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. दिवसभर मंदिर परिसरात भक्तांची वर्दळ कायम होती. अधिक मासातील कमला एकादशीला विशेष महत्त्व असल्याने पैठण नगरीत धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून भाविकांनी मोठ्या श्रद्धाभावाने दर्शनाचा लाभ घेतला.